तुमची मुले शिकत असलेली शाळा बोगस तर नाही ना?
पुणे जिल्ह्यातील १२ प्राथमिक शाळा अनधिकृत !, बघा संपुर्ण यादी
पुणे दि २०(प्रतिनिधी) – शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा महागडे प्रवेश शुल्क भरून विविध शाळामध्ये प्रवेश घेत असतात, पण याचवेळी अनेक शाळा कोणतीही परवानगी न घेता उघडल्या जातात ज्या अनधिकृत असतात. त्यामुळे मुलांचे पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. तर पालकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील बोगस शाळांची नावे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळेत मुलांना न घालण्याचे आवाहन केले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची तपासणी केली असून यात तब्बल १२ शाळा अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. या शाळेत आपल्या मुलांना घालू नये असे आवाहन देखील केले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वेक्षणामध्ये बारा शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचा अहवाल शिक्षण विभागाला दिला आहे. तालुकसनिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. शासनाची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्याचा प्रकार समोर आला. या सगळ्या शाळांची मनमानी कारभार थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांच्या नावांची यादीच जाहीर केली आहे. यात यामध्ये पुंरदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. या आवाहनामुळे पालकांची होणार फसवणूक टळणार आहे.
बोगस शाळा अनधिकृतपणे
१) मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, दौंड
२) क्रेयांस प्री प्रायमरी स्कूल, कासुर्डी (दौंड)
३) के.के. इंटरनॅशनल स्कूल, बेटवाडी (दौंड)
४) पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, लोणीकाळभोर (हवेली)
५) जयहिंद पब्लिक स्कूल, भोसे (खेड)
६ ) एस.एन.बी.पी÷. टेक्नो स्कूल, बावधान (मुळशी)
७) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे (मुळशी)
८) साई बालाजी पब्लिक स्कूल, नेरे (मुळशी)
९) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, वीर (पुरंदर)
१०) कल्पवृक्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, किरकीटवाडी (हवेली)
११) क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी (हवेली)
१२) किंडर गार्डन इंग्लिश मिडीयम स्कूल, खडकवासला (हवेली)
पालकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी त्यावेळी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेत प्रवेश घेताना शासनाचे ना- हरकत प्रमाणपत्र, संबंधित मंडळाचे प्रमाणपत्र, राज्य शासनाचे इरादापत्र या बाबींबरोबरच पालकांनी यू- डायस पोर्टलवर जाऊन शाळेची माहिती घेणे आजघडीला गरजेचे आहे.