Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

'या' तारखेला होणार शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी

मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटून गेला असला तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधक यामुद्यावर टिका करत होते. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. येत्या ५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकांवरील निकाल ४ ऑगस्टला येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही महत्त्वाचा निर्णय आल्यास त्यावर ही मंत्रिमंडळ विस्ताराची दिशा अवलंबून आहे. शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यास ५ तारखेला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती दिली होती. त्यामुळे पाच तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने विरोधक टिका करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीलाही विलंब होत आहे.असा आरोप त्यांनी केला होता. तर एक दुजे के लिए सरकार अशीही टिका विरोधकांकडून सरकारवर केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!