Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यात पुन्हा मुसळधार

हवामान विभागाचा 'या' भागाला इशारा

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- राज्याला जुलै महिन्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर पूरपरिस्थिती निर्माण झाली,तर काही जिल्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळेच जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उसंत घेतली होती. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यतील मुंबई, ठाणे, पुणे, सातारा,सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, लातूर या भागात पाऊस झाला आहे. तर येत्या तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रसह घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर मराठवाडा आणि विदर्भाला या पावसाचा सर्वाधिक फाटक बसला आहे. अनेक ठिकाणी शेती सुद्धा नुकसान झालं. राज्यात जवळपास आठ लाख हेक्टरहुन जास्त क्षेत्रात पिकांचे नुकसने झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.त्याचबरोबर देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

कोयना धरणासहित कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट-माथ्यावरील तसेच नाशिक-नगर जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळं मान्सून 4 ते 12 ऑगस्ट या 12 दिवस महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!