Latest Marathi News
Ganesh J GIF

राजधानीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाचा जागर*

या चित्ररथामुळे एकनाथ शिंदेंची चर्चा पहा कोणता होता तो चित्ररथ

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राच्या चित्ररथाने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ सादर करण्यात आला होता.

महाराष्ट्र संताची आणि देवतांची भुमी आहे. महाराष्ट्रात महत्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्ध शक्त‍िपीठ आहे. या शक्तिर्पीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे. चित्ररथाच्या पुढील दर्शनिय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी , गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा आहेत. यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती दिसणार. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा साकारण्यात आली होती.

महत्वाचे म्हणजे या चित्ररथ संचलनावेळी एकनाथ शिंदे यांची चर्चा रंगली कारण त्यांनी नवस केलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती राजपथावर पाहायला मिळाली.महाराष्ट्रातील सत्तानाट्य घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेत नवस केला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!