Just another WordPress site

अभिताभ बच्चन यांच्या घरात भाड्याने राहते ही अभिनेत्री

दर महिन्याला जेवढे भाडे भरते तो आकडा एैकून धक्का बसेल, पहा किती आहे भाडे

मुंबई दि २५(प्रतिनिधी) – बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहेत. काही काळापूर्वी त्यांनी बँकेला एक मालमत्ता दिली होती अंधेरी भागातील तो डुप्लेक्स फ्लॅट बाॅलीवूडमधील अभिनेत्री क्रिती सेननने भाड्याने घेतला आहे. त्यासाठी ती भरभक्कम भाडे देत आहे. अभिनेत्रीने या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी दोन वर्षांचा करारही केला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी ३१ कोटींना डुप्लेक्स आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हे डुप्लेक्स मुंबईतील अंधेरी भागात आहे. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या या फ्लॅटसाठी अभिनेत्री क्रिती सेनन दर महिन्याला १० लाख रुपये भाडे देते.त्याचबरोबर क्रिती सेननने ६० लाख रुपये सुरक्षा म्हणून दिले आहेत. करारही झाला आहे. कृती सेननने ते दोन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात अमिताभ बच्चन यांनी जुहूची मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्याने दिली होती. बँकेने यासाठी त्यांना १२ महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स दिला आहे.

GIF Advt


अमिताभ बच्चन यांचे मुंबईच चार बंगले आहेत. जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वत्स अशी या बंगल्यांची नावं आहेत. अमिताभ आपल्या कुटुंबासह मुंबईतल्या जुहू इथं असलेल्या जलसा बंगल्यात राहतात. सलमान बाबत सुद्धा म्हटले जाते कि त्याने गॅलेक्सी अपार्टमेंट शिवाय वांद्रे येथे आणखी एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!