Latest Marathi News
Ganesh J GIF

नऊ तासाच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर

कार्यकर्त्यांचे आंदोलन, बाहेर आल्यानंतर पाटील म्हणाले ईडीकडे आता कोणतेही...

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीने समन्स पाठवल्यानंतर आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आज ईडीकडून जयंत पाटील यांची तब्बल साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आहेत.

जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आले. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी पाटील राज्याचे गृहमंत्री होते. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘आज तुम्ही दिवसभर थांबला. महाराष्ट्रातील गावातून येथे येऊन दिवसभर समर्थन दिले. माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. पक्षाला समर्थन दिलं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिले आहेत. ईडीकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील. नागरिक म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलं आहे. दिवसभरात मी अर्ध पुस्तक वाचून काढलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान २००५ मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. ३ आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली होती.

आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहीम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशी होत आहे. राज ठाकरे यांचीही ईडीने या प्रकरणी चौकशी केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!