Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीला मिळत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या

पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी, व्हिडिओ शेयर करत म्हणाली, मुर्ख बनवण्याच्या...

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणाने आता वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.असा दावा क्रांती रेडकर यांनी केला आहे.


समीर वानखेडे हे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत.मला आणि माझी पत्नी क्रांती रेडकरला गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर धमक्या आणि अश्लील मेसेज येत आहेत, असे समीर वानखेडे म्हणाले आहेत. वानखेडे म्हणाले की, “गेल्या चार दिवसांपासून मला धमक्या येत आहेत. याची माहिती मी पोलीस आयुक्तांना देणार आहे. जे काही आहे ते मी चौकशीमध्ये सांगणार आहे. सुरक्षेची खूपच समस्या आहे. जे काही आहे ते पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना कळवणार आहे. सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येत आहेत,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. दुसरीकडे क्रांतीने सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने कोणाचेही नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती म्हणाली की, ‘मुर्ख बनवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक जे खरं नाही त्यावर विश्वास ठेवणं आणि दुसरं म्हणजे जे खरं आहे त्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा एकदा ऐका आणि समजून घ्या. असे क्रांती म्हणाली आहे. जेव्हापासून हे आर्यन खान प्रकरण सुरू झालं आहे तेव्हापासून क्रांती समीर वानखेडे यांना साथ देत आहे.

समीर वानखेडेवर आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे. या आरोपानंतर सीबीायकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!