Latest Marathi News
Ganesh J GIF

व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस पत्रकारांनी ठेवावे- लोकमत संपादक संजय आवटे

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे उद्घाटन

पुणे दि २६(प्रतिनिधी)- दि २२ जुलै रोजी लोणी काळभोर येथील राजकपूर सभागृह एम आय टी विद्यापीठ येथे महाराष्ट्रातील शेकडो पत्रकारांच्या उपस्थितीत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे उद्घाटन पार पडले.यावेळी पहिल्या सत्रात लोकमतचे संपादक संजय आवटे,ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.यावेळी लोकमत वृत्तपत्राचे संपादक संजय आवटे यांनी पत्रकार व सामाजिक जबाबदारी या विषयावर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांच्या बाजूने उभे राहून त्यांचा आवाज होणे गरजेचे असून सत्तेमधील लोकांना व व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस करणे आज गरजेचे आहे.तसेच आजची राजकीय परिस्थिती पाहता सध्या पत्रकार हाच सर्वसामान्य लोकांच्या व्यथा मांडू शकतो. कुठल्याही माध्यमावर काम करा त्यात आशय महत्त्वाचा आहे.लोकशाहीची गळचेपी थांबवायची असेल तर पत्रकाराने जागरूक असणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकारिता आणि न्यायिक बंधने या विषयावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की लोकशाहीचे खरे रक्षक पत्रकार हेच असून भावनिक होऊन पत्रकारिता करण्यापेक्षा कायद्याच्या आधार घेऊन पत्रकारिता करावी.तसेच अन्यायग्रस्त पत्रकारिता न करता हिंमत वापरून अन्याय झालेल्या लोकांना मदत करणारी पत्रकारिता असावी.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिंट व डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांनी केले.उपस्थितांमध्ये दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद,कृषी उत्पन्न बा.समिती हवेली सभापती दिलीप काळभोर,कृषी उत्पन्न बा.समिती हवेली उपसभापती रवींद्र कंद,कृषी उत्पन्न बा.समिती हवेली सदस्य प्रशांत काळभोर,सुदर्शन चौधरी,कदमवाकवस्ती सरपंच चित्तरंजन गायकवाड,पंचायत समिती हवेली मा.उपसभापती सनी काळभोर,संतोष कांचन, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ.चंद्रा,पूर्व हवेली डॉकटर असोसिएशनचे डॉ रतन काळभोर व डॉ वंदना काळभोर उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी केले.

यावेळी दाैंडचे शमदार राहुल कुल यांनी पत्रकारांनी समाजाला खऱ्या अर्थाने भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी करणे गरजेचे आहे.तसेच सध्याचे राजकीय वातावरण पाहता पत्रकारांना एक चांगली संधी यामधून मिळालेली आहे.फक्त लोकांपर्यंत योग्य व खरी माहिती आपल्या माध्यमातून जाणे गरजेचे आहे.जेणेकरून जनसामान्यांमध्ये गैरसमज व भीती पसरू नये व सत्य बाजू लोकांसमोर कशी येईल याचा प्रयत्न आजच्या पत्रकारांनी करणे गरजेचे आहे, असे मत मांडले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!