Latest Marathi News
Ganesh J GIF

दबावाला बळी न पडता पत्रकारांनी निर्भीडपणे भूमिका मांडावी

पत्रकार दिनानिमित्त हडपसरच्या पत्रकारांचा अजित पवारांच्या हस्ते सन्मान

हडपसर दि ७ (प्रतिनिधी)- समाजातील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारतिकडे पाहिले जाते खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात वस्तूस्थिती समाजासमोर मांडण्याचे काम करावे लागते प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे पत्रकारांनी कोणत्याही व्यक्तीच्या दबावाखाली न राहता निर्भीडपणे लेखणीतून आपली भूमिका मांडावी असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.

हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कै. बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाच्या औचित्य साधून हडपसर परिसरातील पत्रकारांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले आमदार चेतन तुपे पाटील माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर माजी नगरसेवक योगेश ससाणे, साधना बँकेचे संचालक प्रवीण तुपे, अमर सृष्टी सोसायटीचे चेअरमन स्वप्निल धर्मे, मा.नगरसेवक शिवाजी पवार,प्रदेश युवक सरचिटणीस अजित घुले,मा.पंचांयत समिती सदस्य जतीन कांबळे,रूपेश तुपे, अविनाश काळे,अजिनाथ भोईटे, आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार दिनाच्या औचित्य साधून हडपसर मधील पत्रकार कृष्णकांत कोबल, सुधीर मेथेकर, अशोक बालगुडे, अनिल मोरे, दीपक वाघमारे, प्रमोद गिरी, विवेकानंद काटमोरे, तुषार पायगुडे, जयवंत गंधाले, दिगंबर माने, अमित मेहंदळे, वसंत वाघमारे, रागिनी सोनवणे यांचा पुस्तक व शाल श्रीफळ देऊन अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, संदीप बधे, यांनी केले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!