अशोक नागटिळक यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्रामला एक हात मदतीचा
महामानव संस्थेने स्नेहग्रामला मायेची मदत जपली सामाजिक बांधिलकी
बार्शी दि ७(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व खाऊ फळे वाटप करुन वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले. अशोक नागटिळक यांचा वाढदिवस स्नेहग्राम कोरफळे, प्रार्थना फाऊंडेशन सोलापूर (किराणा धान्य माल , खाऊ फळे ) , जय तुळजाभवानी माता प्राथमिक आश्रम शाळा तुळजापूर ( नवीन फ्रीज 80 मुलांना जेवण ) येथे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
अशोक नागटिळक महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना मायेला ओलावा मिळावा, भूकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्मिला काकी देशमुख तर प्रमुख पाहुणे बबनराव कटकर तर प्रमुख उपस्थिती बापू नागटिळक हे होते. अशोक नागटिळक महाराज यांचा सत्कार उर्मिला देशमुख , बबनराव कटकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहग्रामच्या मुलांना अशोक नागटिळक यांचे अभिष्टचिंतन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची
प्रस्तावना भैरवनाथ चौधरी, सूत्रसंचालन राजेश स्वामी तर आभार प्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.
याप्रसंगी मानवता बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उपाध्यक्ष गौतम नागटिळक, महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे , निलेश गिराम , आप्पा स्वामी , सूरज रसाळ , विष्णू शिंदे , महेश जाधव , अरविद आतकरे, सुजित काळे, गणेश लंगोटे , श्याम जाधव, किरण डोलारे, रितेश नागरगोजे , अभिराज नागटिळक , संकेत कानवळे, आदित्य माने, राजेश स्वामी , सारिका स्वामी आदि मान्यवर उपस्थित होते.