Latest Marathi News
Ganesh J GIF

कसबा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

बंडखोरीच्या शक्यतेमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमध्ये ट्विस्ट

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असले तरीही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीकडुन अनेकांनी लढण्याची इच्छा व्यक्त करत तयारी सुरु केली आहे. भाजपने ही  निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर शिंदे गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. पण दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात चढाओढ पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी निवडणूकीवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अंकुश काकडे, रुपाली पाटील, रवींद्र माळवदकर, दीपक मानकर, गणेश नलावडे, शिल्पा भोसले, वनराज आंदेकर, गोरख भिकुळे, दत्ता सागरे यांनी हजेरी लावल्यामुळे हे राष्ट्रवादीतील इच्छुक असल्याची चर्चा सुरु झाली आहे. चिंचवड साठी नाना काटे यांनी तयारी सुरु केली असली तरी ते कोणाकडून निवडणुकीत उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कसबामधून भाजपाकडून शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे पोटनिवडणूकीत रंगत आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!