Latest Marathi News
Ganesh J GIF

‘कॅटरिना कैफमुळे माझे करिअर संपले, मला संधीच मिळाली नाही’

या अभिनेत्रीचा कॅटरिनावर मोठा आरोप, बाॅलीवूडवर मोठा आरोप, म्हणाली लोक टॅलेंट न बघता फक्त..

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकजण याय यशस्वी होते असे नाही. काहीजणांच्या वाट्याला अपयश येते. त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. पण बाॅलीवूडमधील एक अभिनेत्री मात्र कायम एका अभिनेत्रीची काॅपी म्हणूनच ओळखली जात होती. त्यामुळे तिच्या करिअरची गाडी कधी रूळावर आलीच नाही आणि तिला अपयशाचा सामना करावा लागला.

अभिनयनापेक्षा कतरिना कैफची काॅपी म्हणून जास्त चर्चा झालेली अभिनेत्री जरीन खान ही लाइमलाईटमध्ये आली आहे. जरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून पदार्पण केले. पण एवढा मोठा डेब्यू प्रोजेक्टही तिचे करिअर वाचवू शकला नाही. पण आता ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने केलेले धक्कादायक वक्तव्य त्यामुळे पुन्हा एकदा बाॅलीवूड ढवळून निघाले आहे. करीमने नुकतेच Reddit वर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन केले आणि युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावर तिला एकाने प्रश्न विचारला की,  “बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या काळापासूनच तुझी तुलना कतरिना कैफशी केली जायची. त्याबद्दल तुला कसं वाटलं त्याचा काही प्रभाव पडला का?” त्यावर उत्तर देत जरीन म्हणाली, “मी बॉलीवूडमध्ये आले तेव्हा मी खरोखरच एका हरवलेल्या मुलासारखी होते. माझ्याकडे कोणतीही चित्रपट पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे जेव्हा माझी कतरिनाशी तुलना केली गेली तेव्हा मला खूप आनंद झाला. मीही तिची चाहती आहे. पण त्याचा माझ्या करिअरवर विपरीत परिणाम झाला. कारण या क्षेत्रातील लोकांनी मला माझे व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची संधीच दिली नाही.” कतरिना कैफमुळे तिला काम मिळणे अवघड झाले होते. कतरिनासारखी दिसते यामुळे तिचे खूप नुकसान झाले असल्याचे जरीन खानने सांगितले आहे.तसेच ती पुढे म्हणाली की, ” मला माझी कला सादर करण्याची संधीच नाही दिली. मला माझे टॅलेंट दाखवण्यापासून थांबवण्यात आले. मला या गोष्टींची चीड आहे की, सिनेविश्वामध्ये लोक टॅलेंट न बघता फक्त मैत्री आहे म्हणून कामे देतात,” असा मोठा आरोपही जरीन खानने केला आहे. या इंडस्ट्रीमध्ये माझे फारसे कनेक्शन नाही असेही जरीन म्हणाली आहे.

जरीन खानच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास तिने वीरनंतर हेट स्टोरी ३, अक्सर २ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय गिप्पी ग्रेवालसोबत काही पंजाबी चित्रपटांतही ती दिसली आहे. त्यात जट जेम्स बाँड सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हम भी अकेले तुम भी अकेले हा तिचा शेवटचा चित्रपट होता. विविध चित्रपटांमध्ये काम करून तिने करिअर वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिला यश आलं नाही. याबाबत तिने खंत व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!