Latest Marathi News
Ganesh J GIF

किशोरी पेडणेकरांची एक पत्रकार परिषद आणि भाजपाची बोलती बंद

याकूब मेमनच्या कबर सजावटीवरुन शिवसेनेला घेरणारा भाजपाच गोत्यात?

मुंबई दि १० (प्रतिनिधी) – मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यात फाशीची शिक्षा झालेला कुख्यात याकूब मेननच्या कबरीवरील सजावटीवरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. काल भाजपाने किशोरी पेडनेकर यांचा मेमनचा भाऊ रऊफ बरोबरचा फोटो व्हायरल करत हल्लाबोल केला होता. पण आज किशोरी पेडनेकर यांनी भाजप नेत्यांचे रऊफ बरोबरचे फोटो सादर करत भाजपाची दांडी गुल केली आहे.

याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत किशोरी पेडणेकर यांची बैठक झाली असल्याचा आरोप करत भाजपाने त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकर यांनी भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिल आहे. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला चांगलेच कोंडीत पकडले. आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. यामुळे भाजपाची चांगलीच पंचाईत झाली आहे. पेडणेकर म्हणाल्या की, “बडा कब्रस्तानच्या समोर पाणी भरलं असल्याने मी तिथे गेले होते. मी बडा कब्रस्तानमध्ये गेले असल्याचं नाकारलंच नाही. पण मी महापौर असताना माझ्या नेत्याने सांगितल्याने तिथे गेले होते. बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र, वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यावर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे.असा आरोप केला आहे.

भाजपाने मेमनच्या सजावटीवरून शिवसेनेला लक्ष्य करताना या सजावटीला उद्धव ठाकरेंची मूक संमती होती असा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेही भाजपाला जशास तसे उत्तर दिले होते. पण रऊफ सोबत पेडणेकरांचे फोटो व्हायरल करणाऱ्या भाजपाची किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत बोलती बंद केली आहे. शिवसेनेला अडकवायला गेलेला भाजपच या फोटोमुळे तोंडघशी पडला आहे. आता भाजप यावर काय उत्तर देणार हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!