वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत
खा. सुळे यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा: राज्याच्या गृहमंत्र्यानी लक्ष घालण्याची मागणी
पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.
पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे असून संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली आहे. या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करतात. नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करतात. वारजे,पुणे येथेही या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.
माझी… pic.twitter.com/SnH3Us74y8
— Supriya Sule (@supriya_sule) June 19, 2023