Latest Marathi News
Ganesh J GIF

जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकत लाखोंचा एैवज लंपास

दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, महाराष्ट्रात दरोड्याच्या घटनेत वाढ, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान

जळगाव दि १२(प्रतिनिधी)- कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावमधील दरोड्याची भर पडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-यावल रस्त्यावरील एका दुकानात सिनेस्टाइल दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेझोरांनी यात लाखोंची रोकड लंपास केली आहे. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-यावल रस्त्यावरील ‘समर्थ ट्रेडर्स’ नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास तीन अज्ञात लोक मोटरसायकलवरून त्याठिकाणी आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. दरोडेखोरांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी दुकानातील तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली केली. त्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या नंतर दुकानमालकाने चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी दरोड्याचा क्रम सांगत चोरांना पकडण्याचे प्रयत्न चालु असल्याचे सांगितले आहे. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चार दरोडेखोर मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे विशेष पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाल्याचेही समजते. तसेच या दरोड्याचे धागेदोरे बिश्नोई टोळीपर्यंत पोहोचले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!