Latest Marathi News
Ganesh J GIF

बिग बॉस`मुळे वकील सना रईस खानला सोडावी लागणार वकील?

बिग बाॅसमधील सहभागाने सनाविरोधात वकीलाची तक्रार, बार काउंसिल ऑफ इंडियामध्ये केली तक्रार, कारण काय?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन वरील लोकप्रिय शो बिग बाॅसची सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर वादालाही सुरूवात झाली आहे. पण बिग बाॅसमध्ये सहभागी होणे, एका स्पर्धकाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे वकिलीची सनद रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा होत आहे.

बिग बाॅस सुरु होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. पण आता सहभागी स्पर्धकांवरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून विविध स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी वकील सना रईस खानचाही समावेश आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणातही सना रईस खान ही आर्यनची वकील होती. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी वकील सना रईस खानने सहा लाख रुपये आकारले आहेत. आणि नेमका यामुळेच वाद निर्माण झाला आहे. वकील आशुतोष दुबे यांनी सनाच्या शोमध्ये सहभागी होण्यावर आक्षेप घेतला आहे. कारण बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियम 47 ते 52 नुसार वकील इतर कोणत्याही नोकरीद्वारे कमाई करू शकत नाहीत. याशिवाय, 1961 च्या कलम 49(1)(सी) अन्वये, प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना इतर कोणत्याही क्षेत्रात पूर्णवेळ नोकरी करण्यास मनाई आहे. असे असतानाही सना खानने या शोमध्ये भाग घेतला आहे. दुबे पुढे म्हणाले की, ‘मी याबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाला कळवले आहे. सना रईस खानने नियमांविरुद्ध बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे.’ आता सनावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. कारण या तक्रारीवर कारवाई झाल्यास सनाचे सदस्यत्व रद्द होईल आणि तिला पुन्हा वकिलीचा सराव करता येणार नाही. दरम्यान बिग बॉसमध्ये सनाने प्रवेश केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कारण कोणत्याही वादासोबत तिचे नाव जोडले गेले नव्हते. तसेच ती तिच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी प्रसिद्ध नव्हती.

सना रईस खान ही फौजदारी वकील आहे. ती मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. तिचे नाव अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये जोडलं गेलं आहे. ती शीना बोरा हत्या प्रकरण आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित आहे. आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!