Latest Marathi News
Ganesh J GIF

एैकावे ते नवलच! दिरासाठी दोन जावांमध्ये जोरदार हाणामारी

दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

पटना दि २१(प्रतिनिधी)- आपल्या भारतीय संस्कृतीत दिर आणि बहिणीचे नाते पवित्र समजले जाते. मोठ्या बहिणीला तर आईचा दर्जा दिलेला आहे. पण काही घटना अशा घडतात की आपला विश्वासच बसत नाही. असाच काहीसा प्रकार बिहार राज्यातून समोर आला आहे. कारण बिहारमधील नालंदा जिल्ह्यात चक्क आपल्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहारमधील नालंदा जिल्ह्यात हिसला मलामा गावात राहणाऱ्या हरेंद्र पासवान या तरुणाच्या मोठ्या भावाचे काही दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. त्यामुळे भावाचा पत्नीसोबत लग्नगाठ बांधून हरेंद्रने त्याच्या मुलांचा सांभाळ करावा, अशी इच्छा नातेवाईकांची होती. त्यामुळे हरेंद्र देखील लग्नाला तयार झाला. मात्र, त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या भावाच्या बायकोने मलाच हरेंद्रसोबत लग्न करायचं आहे, असा हट्टा धरला. या महिलेचा हरेंद्रच्या संपत्तीवर डोळा होता असा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला लग्नावरुन दोघांमध्ये वाद झाला. पण पुढे जात धाकट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांमध्ये चक्क बाचाबाची झाली. यावेळी दोघींनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर दोन्ही महिलांकडील माहेरची माणसे देखील एकमेकांसोबत भिडली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सध्या संपूर्ण शहरात या अजब घटनेची चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करी हा वाद मिटवला. मात्र, तरी देखील दोन्ही जावा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर पोलिसांनी लग्न झालेल्या एका महिलेला ताब्यात घेतलं आणि विधवा महिलेचे लग्न दिरासोबत लावून दिले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!