भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर
बड्या अभिनेत्रीना मागे सारत ही अभिनेत्री पहिल्या स्थानावर, बघा संपुर्ण यादी
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- अलीकडे बाॅलीवूड पेक्षा साऊथच्या फिल्मची चलती आहे. पण आता तिथल्या अभिनेत्रीही आघाडी घेत आहेत.अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. समांथा हिने एका बाबतीत दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टलाही मागे सोडले आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.
सामंथा रुथ प्रभू हिला भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. सामंथा रुथ प्रभूने या यादीत अव्वल स्थान पटकावले असून तिने बॉलिवूडच्या आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणला मागे टाकले आहे. Ormax Stars India Loves ने नुकतीच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत जवळपास १० अभिनेत्रींची नावे जाहीर करण्यात आली असून या यादीत सामंथा रुथ प्रभूने पहिले स्थान पटकावले आहे. तर या यादीत समांथा पाठोपाठ बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर, साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा तिसऱ्या क्रमांकावर, काजल अग्रवाल चौथ्या क्रमांकावर, दीपिका पदुकोण पाचव्या, रश्मिका मंदान्ना सहाव्या, कतरिना कैफ सातव्या, अनुष्का शेट्टी आठव्या क्रमांकावर आहे. नवव्या क्रमांकावर क्रिती सुरेश आणि दहाव्या क्रमांकावर त्रिशा कृष्णन या अभिनेत्री आहेत. ओरमॅक्स स्टार्स इंडिया लव्हजने जाहीर केलेल्या या यादीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री चमकत आहेत.

समांथाचे चाहते या निकालाने खूप खुश आहेत.सर्वजण तिचे कौतुक आणि अभिनंदन करत आहेत.समांथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण दिपीका आणि आलीयाला मागे टाकत समंथाने मोठे यश मिळवले आहे.