Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपा नेत्याचा महात्मा फुले ऎवजी निळू फुलेंना मानाचा मुजरा

भाजप नेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, महापुरूषांविषयी चुकीचे वक्तव्य

कोल्हापूर दि ५(प्रतिनिधी)- चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमात भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी महापुरुषांचा उल्लेख करत असताना महात्मा फुलेंऐवजी चक्क निळू फुलेंचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील वाळकुडी-केरवडे येथे जलजीवन योजनेचा आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानसचा मुजरा करून भाषणास उभा आहे. यावेळी महापुरुषांचा उल्लेख करताना शाहू, फुले, आंबेडकरांऐवजी चक्क निळू फुले यांचे नाव घेतल्याने गोंधळ उडाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. निळू फुले हे खरंच अभिनेते होते. पण त्यांचा उल्लेख ज्या पद्धतीने चुकून एका संभाव्य आमदाराने आपल्या भाषणात केलाय त्यावरुन संबंधित नेत्यावर टीका होत आहे.पाटील यांनी विधानसभेची गेली निवडणूक भाजपच्याच छुप्या पाठिंब्यावर परंतु अपक्ष लढवली. आगामी निवडणुकीत ते भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत.

 

महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नष्ट होत चालली असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यात या व्हिडिओवर गमतीशीर
प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!