Latest Marathi News
Ganesh J GIF

नव्या फोटोशूटमुळे महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री ट्रोल

नेटक-यांनी घेतली शाळा, म्हणाले नक्की काय पहायचे, या हटके फोटो आणि कॅप्शनमुळे ट्रोल

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री आहे. तिचे चाहते प्रत्येक वयोगटात आहे. शिवाय प्राजक्ताचा सालस आणि निर्मळ अंदाज तिला इतरांपेक्षा हटके बनवतो. पण हीच प्राजक्ता माळी फोटोशूटमुळे ट्रोल झाली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने अधिकृत सोशल मीडियावर हॅण्डल इंस्टाग्रामवर हे नवं फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली आहे. हे फोटो शेअर करताना तिने दोन पोस्टमध्ये वेगवेगळ्या बोल्ड पोझमधील फोटो शेअर केले आहेत. यातील एका पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एक तो कम ज़िंदगानी.उससे भी कम है.’. याशिवाय दुसऱ्या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हुस्न- ओ- इश्क़ के दम से ज़माना, यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना..’. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि यावर कमेंट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एकाने सध्या सगळेच पाठ दाखवून फोटो का काढत आहेत? असा विचारला आहे तर आणखी एकाने ‘नेमकं काय बघू मी.. तोंड का..?’ अशी उपरोधिक कमेंट केली आहे तर एका युजरने असे फोटो नका टाकू. बाकी लोकांमध्ये आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फरक राहू द्या”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्याबरोबरच एकाने “ताई तुमची फिगर नाही चेहरा आवडतो आम्हाला”, असे म्हटले आहे.

प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!