Latest Marathi News
Ganesh J GIF

मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी?

शिंदे गटाला विस्तारात भाजपापेक्षा कमी जागा, नाराजी शिंदेची अडचण वाढवणारी?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाला दिलासा देणारा ठरल्याने आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होऊ लागली आहे. पण दोन्ही बाजूंनी अनेकजण इच्छुक असल्याने शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. त्यातच आमदार प्रताप सरनाईक यांनी खळबळजनक विधान केले आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. आम्हाला कोट शिवायला टाकायची गरज नाही. एकनाथ शिंदे आम्हाला कोटासह मंत्रीपद देतील. लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सरनाईक म्हणाले आहेत.दरम्यान सरनाईक यांनीच पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना पत्र लिहित भाजपासोबत जाण्याची गळ घातली होती. पुढे बोलताना सरनाईक म्हणाले की, थोडी फार संकटं होती तीही दूर झाली आहेत. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. ते नक्कीच मंत्रीमंडळ विस्तार करतील.” असे म्हणत आपण इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे गेल्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळालं नाही, तेव्हा मी नाराज होतो. पण अशा नाराज्या असतातच. सगळ्यांनाच मंत्री करता येत नाही. सगळेजण मुख्यमंत्री होत नाही किंवा सगळेच जण उपमुख्यमंत्री होत नाहीत. असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रीपदाची इच्छा दाखवली आहे.

महाराष्ट्रात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊन एक वर्ष होत आलं तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता लवकरच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होईल असे बोलले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!