Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरूरमध्ये महायुती आघाडीवर ; माऊली आबा कटके यांनी घेतली १२३३३ मतांची आघाडी

गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता.

अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीला सुरवात झाली असून कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर हे आता समोर येत आहे.

सुरवातीला टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलामध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे माउली कटके आघाडीवर असून मविआचे अशोक पवार पिछाडीवर आहेत..मतमोजणीला सुरुवात झाली असून शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे माऊली आबा कटके आघाडीवर आहेत. चौथी फेरी अखेर माऊली आबा कटके यांनी १२३३३ मतांची आघाडी घेतली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!