
आषाढी पालखी सोहळ्यामुळे पुण्यात वाहतुकीत मोठे बदल
बाहेर पडताना बदल पाहूनच बाहेर पडण्याच्या सुचना, एक हजार पोलीस करणार वाहतुकीचे नियमन
पुणे दि १०(प्रतिनिधी)- आषाढी वारीनिमित्त संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी येणार आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस बदललेले मार्ग पाहून प्रवास करावा लागणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे १० जून रोजी देहू येथून प्रस्थान झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे ११ जून रोजी आळंदी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी घातली गेली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी १०० कर्मचारी राहणार तैनात करण्यात आले आहे.
तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाहतूक बदल
*बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने चर्च चौक).
*चर्च चौक (भाऊ पाटील रोड ब्रेमेन चौक औंधमार्गे).
*पोल्ट्री फार्म चौक (रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता ब्रेमेन चौक).
*मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक (अंतर्गत रस्त्याचा वापर करावा).
*चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक- जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहने बंद करण्यात येतील (बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून औंध रस्तामार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे).
*आर.टी.ओ. ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक (आरटीओ चौक – शाहीर अमर शेख चौक – कुंभार वेस चौक किंवा आरटीओ चौक- जहाँगीर चौक आंबेडकर सेतू ते गुंजनमार्गे).
*सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (पर्णकुटी चौक-बंडगार्डन पूल-महात्मा गांधी चौकमार्गे).
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वाहतूक बदल
*कळस फाटा से बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक (धानोरी आणि अंतर्गत रस्त्याने).
*मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन (जेल रोड- विमानतळ रोड मार्ग).
*सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता (पर्णकुटी चौक -गुंजन चौक -जेल रोड- विश्रांतवाडी चौक).चंद्रमा चौक ते आळंदी रोड (अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा).
*नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद. होळकर पूल ते चंद्रमा चौक आणि होळकर पूल ते साप्रस चौकी मार्ग बंद.
*१२ जुन दुपारपासुन वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग*
*गणेश खिंड रस्ता- रेंजहिल चौक ते संचेती चौक- (रेंज हिल्स- खडकी पोलिस ठाणे अंडरपास- पोल्ट्री चौक- जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रेंज हिल्स- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक).
*फर्ग्युसन रस्ता- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (खंडोजीबाबा चौक- कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता).
*शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे मार्ग (गाडगीळ पुतळा – कुंभारवेस चौक-आरटीओ चौक).
*वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग (पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल मार्ग किंवा औंध मार्ग).
*मॉडर्न कॉलेज रस्ता- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (घोले रोड व आपटे रोड).
*कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक (कुंभार वेस- पवळे चौक- फडके हौद चौक किंवा मालधक्का चौक- नरपतगीर चौक- १५ ऑगस्ट चौक – कमला नेहरू रुग्णालय).
*वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध.
*अरूणा चौक ते पारशी अगेरी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी.