Latest Marathi News
Ganesh J GIF

…. तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल

राष्ट्रवादीचा शरद पवारांना धमकी देणाऱ्यांना इशारा, इस्लामपुरात राष्ट्रवादीकडून धमकीचा निषेध

इस्लामपूर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या केसाला धक्का लागला,तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल,असा इशारा वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे दिला. आपण तालुक्यात व जिल्ह्यात आप-आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना राज्यात फिरण्यास मोकळीक देण्याचा निश्चयही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम ध्वजारोहण करण्यात आले. नंतर केक कापून संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, पवारसाहेबांच्या केसाला धक्का लागल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. धमक्यांचे प्रकार बंद करा. मध्यंतरी जयंतराव पाटील यांना ईडीकडून त्रास दिला. मात्र आम्ही असल्या प्रकारांना घाबरणार नाही. जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेबांच्या नेतृत्वा खाली अनेक वादळे झेलली आहेत. पक्ष येणाऱ्या आव्हानांही समर्थपणे तोंड देईल. साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे,हे आपले स्वप्न आहे. या ध्येयाच्या गडावर ते पोचत नाहीत,तोपर्यंत आपणास खिंड लढवायची आहे. पक्षापुढील आव्हाने मोठी आहेत. आपणास चिंतन करीत पुढे जावे लागेल. राज्यात जातीय तणाव निर्माण केला जात असून दलित व महिलांच्यावरील अन्याय वाढला आहे. छाया पाटील म्हणाल्या,मनुवादी विचाराचे लोक देश आणि राज्य रसातळाला नेत आहेत. आपणास त्यांना पक्षाच्या माध्यमातून विचारांची लढाई करून रोखायला हवे.

प्रारंभी युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी दादासो मोरे,विठ्ठल पाटील,हणमंत माळी, राजकुमार कांबळे,सचिन कोळी,स्वरूप मोरे,राजकेदार आटूगडे,डॉ.अशोक पाटील, अनिल पावणे,शंकरराव पाटील,मेघा पाटील, सायली गोंदील,शैलेश सुर्यवंशी,विशाल सुर्यवंशी,माणिक पाटील,विनायक यादव, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!