Just another WordPress site

चित्रपटातील सीन पाहत मुलीने वडिलांसोबत केले असे काम…

बेळगावातील तो गुंता पोलीसांना सोडवला, पुणे कनेक्शन समोर

बेळगाव दि २(प्रतिनिधी) – बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. पोलिसांना अखेर या खुनातील आरोपींना शोधण्यात यश आले आहे. पोटच्या मुलीनेच आई आणि प्रियकराच्या मदतीने वडिलांची केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दृश्यमान चित्रपट पाहून बापाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.

GIF Advt

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव येथील सुधीर कांबळे हे दुबईत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत होते. पण कोरोना काळात ते कुटुंबासह बेळगावमध्ये स्थायिक झाले. पण दुबईतुन आल्यानंतर सुधीर आणि पत्नी रोहीणीत सतत वाद होऊ लागले. तसेच सुधीरने पुण्यात जाॅब करणा-या मुलीला तिच्या प्रियकरासोबत संबंध तोडण्यास सांगितले. त्यामुळे मुलीने वडिलांना संपवण्याचा कट रचला. याबाबत तिने प्रियकर अक्षय आणि आईला सांगितले. त्यानंतर तिघांनी प्लान तयार केला. घटनेच्या दोन दिवशी आधी स्नेहाचा प्रियकर पुण्याहून बेळगावला आला. दोन दिवसानंतर सुधीर हा घराच्या वरच्या खोलीत झोपला होता. त्या दिवशी सकाळी अक्षय मागच्या दाराने घरी आला त्याने सुधीरच्या शरीरावर चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर तो पुण्याला परतला. त्यानंतर आई-मुलीने वडिलांचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला होता.

पोलिसांनी खून केलेल्या व्यक्तीची पत्नी रोहिणी कांबळे, त्यांची मुलगी स्नेहा कांबळे आणि स्नेहाची प्रियकर अक्षया विठ्ठकर यांना पुण्यातून अटक केली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेली स्नेहा पुण्यात हॉटेल रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अक्षयच्या प्रेमात पडली होती. पण तिने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या वडिलांचा खून केल्याचे समोर आले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!