Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठा आंदोलनाचे लोण आता पुण्यात, टायर पेटवर रास्तारोको

मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको, रस्त्यावर वाहनांच्या रांगा, मराठा समाज आक्रमक, पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. पण शांततेत सुरु असलेली आंदोलने आता उग्र होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरात पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठा आरक्षणाचे लोण आता पुण्यात देखील पोहोचले आहे.

पुण्यातील नवले पुल परिसरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. वडगाव तसेच नवले पुलावर वाहनांचे टायर जाळत वाहतूक अडवण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी नवले ब्रीज येथे घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या ठिकाणी मराठा समाजाच्या तरूणांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या लांब रांगच रांग लागल्या आहेत. यावेळी पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांना आंदोलन महामार्गावरून बाजू घेण्याची विनंती करत आहेत, परंतु आंदोलक आक्रमक होऊन महामार्गावरच ठिय्या मांडला आहे. जवळपास हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे तसेच बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केले असून वाहतूक नियंत्रण करण्याचा अडथळा येत आहे. पण आता पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं आहे. पहिल्या अर्धातासात साताऱ्याकडील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व्हिस रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती डीसीपी सोहेल शर्मा यांनी दिली आहे. सकाळी पुणे सोलापूर महामार्ग देखील रोखण्यात आला होता.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांकडून काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान आंदोलन आक्रमक झाल्याने सरकार अडचणीत आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!