मराठी अभिनेत्री लवकरच करणार हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण
वाईट काळातही अभिनेत्रीची ती पोस्ट चर्चेत, या चित्रपटात साकारणार भुमिका
मुंबई दि ३(प्रतिनिधी) – मराठी अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी व तिचा पती प्रदीप खरेरा लवकरच घटस्फोट घेणार आहेत. पण याच दरम्यान मानसीने एक नवीन पोस्ट शेअर करत नवीन घोषणा केली आहे.
मानसी नाईकने नुकतंच तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वतःलाच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं लिहिलंय आणि यासोबतच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्याची गोड बातमी दिली आहे ती आगामी हिंदी चित्रपट ‘सिफर’ या चित्रपटातुन हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. मानसी नाईकने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणाली, “मला स्वत:ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा पहिला हिंदी चित्रपट. एक नवीन सुरुवात – ‘सिफर’. माझा पहिला हिंदी वेब शो. यंदाचा माझा वाढदिवस अधिक स्पेशल झाला. शुभेच्छा असू द्या.” अशी पोस्ट तिने केली आहे. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मानसी ओळख महाराष्ट्रात आहे. पण आता ती लवकरच हिंदीतही आपली अदा दाखवणार आहे.
मानसी नाईकच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव सिफर असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विनोद वैद्य यांनी केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे देखील अजून गुलदस्त्यात आहे.