Latest Marathi News

राज्यपाल भगतसिंह कोशारींच्या हस्ते प्रविण पवारांचा सन्मान

महाराष्ट्र शासन व मैत्री पीस फाउंडेशनचा श्री पुरस्काराने प्रविण पवार सन्मानित

तुळजापूर ( सतीश राठोड ) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथील गोर आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार यांचा महाराष्ट्र शासन व मैत्री पीस फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते गौरव श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

प्रवीण पवार हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक कृषी व महिला बालकल्याण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे . गोर आर्मी संघटनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हा सह राज्यातील बंजारा समाजाच्या समस्याची करण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रवीण पवार यांना महाराष्ट्र शासन व मैत्री पीस फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने राज्यपाल भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते तर सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अनु मलिक , राजपाल यादव , कैलास मासुम , मैत्री पीस फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरजित बारूवा सह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रवीण पवार यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र सह देशभरातील विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर देखील उपस्थित होते .

आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळा प्रसंगी तुळजापूर पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव सालगे , खुदावाडी येथील भाजपाचे युवा नेते अनिल पवार , महेश चव्हाण , नागेश पवार देखील उपस्थित होते . त्यांच्या या पुरस्काराबद्दल उस्मानाबाद जिल्हा सह पर जिल्ह्यातील मित्र परिवारातून अभिनंदन केले जात आहे .

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!