Latest Marathi News
Ganesh J GIF

समीर वानखेडेसोबत मराठी अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

एनसीबीच्या अहवालात धक्कादायक खुलासा, समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या, पत्नीही गोत्यात

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. त्यांना २२ मे पर्यंत अटकेपासून अभय मिळाले असले तरीही अडचणी मात्र वाढल्या आहेत. एनसीबीच्या एका अहवालातून समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनसीबीच्या अहवालात समीर आणि क्रांती रेडकर यांच्या एकुण खर्चाबद्दल तपशील देण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची वाशिममध्ये ४.२ एकर जमीन आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये त्यांच्या मालकीचे ४ फ्लॅट्स आहेत. तर त्यांनी गोरेगावमध्ये अडीच कोटी रुपयांचा पाचवा फ्लॅट विकत घेतला आहे. आपल्या कुटुंबासोबत समीर वानखेडे २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये ६ वेळा परदेशात फिरायला गेले होते. यामध्ये त्यांनी युके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसारख्या देशांना भेट दिली होती. या ट्रिपसाठी वानखेडे यांनी तब्बल ८.७५ कोटी लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. मात्र, या पैशांमध्ये एवढ्या सगळ्या देशांमध्ये जाण्याचा विमान खर्च निघणेही अवघड आहे. त्याचबरोबर विरल राजन यांच्याकडून समीर वानखेडे यांनी 22 लाख रुपयांचे चार रोलेक्स घड्याळ 17.4 लाख रुपयांमध्ये उधारीवर विकत घेतले होते. या घड्याळाच्या एका बिलावर 22.5 लाख तर दुसऱ्या बिलावर 20.53 लाखाची किंमत नोंदवण्यात आली होती. त्याचबरोबर विरल राजन यांना वानखेडे यांनी चार घड्याळ विकले होते. यासाठी विरल राजनने 7.4 लाख रुपयांचा चेक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या नावावर जमा केला होता. पण हे पैसे कुठून आले त्याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. एकूनच समीर वानखेडे यांनी दिलेल्या संपत्तीचा तपशील आणि मूळ तपशील यामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे.


वानखडेंनी घड्याळाच्या बाबतीत बोलताना त्यांना हे घड्याळ पत्नी क्रांतीने गिफ्ट केलं होते. असा दावा केला होता. पण ज्यावेळी एसआयटीने क्रांतीचे तीन वर्षांचे आयकर रिटर्न तपासले त्यादरम्यान त्यांचं उत्पन्न २१ लाख रुपये होते.नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे झोनल डायरेक्टर म्हणून त्यांचा महिन्याचा पगार दीड लाखांच्या जवळपास आहे.पण त्यांचा खर्च मात्र भरमसाठ असल्याचे समोर आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!