Latest Marathi News
Ganesh J GIF

सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

डीके शिवकुमार बनले उपमुख्यमंत्री, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, हे असणार नवे मंत्री

बंगळूर दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. पक्षाने १३५ जागा जिंकल्या आहेत. भाजपने ६६ जागा जिंकल्यानंतर आहेत. या निवडणुकीत जेडीएसला १९ जागा मिळाल्या. पण आज अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर ९ मंत्र्याचा शपथविधी पार पडला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. पण नंतर काही दिवसांच्या बैठकीनंतर अखेर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. त्यानंतर आता आज कर्नाटक सरकरचा शपथविधी पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात जी परमेश्वर, के एच मुनीयप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, सतिश जरकीहोली, प्रियांक खर्गे, रामलिंग रेड्डी, बी. झेड. झमीर अहमद खान यांचा समावेश करण्यात आला आहे. हा शपथविधी सोहळा कर्नाटकच्या बंगळुरूमधील श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. याच स्टेडियमवर सिद्धरमय्या यांनी २०१३ पहिल्यांदा शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचं औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकीचं प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिलं जात आहे. यानिमित्तानं देशभरातील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं दिसून येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!