Just another WordPress site

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटातील गीतांचीही प्रेक्षकांना भुरळ, अभिनेत्री गायिकेचे हे गाणे जोरदार हिट

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा आगामी मराठी चित्रपट ‘गेट टुगेदर’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक प्रेमकथा असतेच आणि त्याच आठवणीतल्या प्रेमकथेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच या चित्रपटातील ‘रूप सजलया’ हे नवे प्रेमगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. आर्या आंबेकर आणि अजय रणपिसे यांचे सुमधुर स्वर लाभलेले हे गाणे अत्यंत श्रवणीय आहे. चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. चित्रपटात एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकिब शेख या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील गाण्यांना अजय रणपिसे यांनी संगीत दिलं आहे आणि प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन, आर्या आंबेकर या गायकांनी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. रूप सजलया हे गाणंही अशाच हळूवार भावना मांडणारं आहे. उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांचा अप्रतिम आवाज या गाण्याला लाभला आहे.

GIF Advt

पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहते याची जाणीव ‘गेट टुगेदर’ चित्रपट करून देतो. रोमान्स, भावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात आहे. ‘गेट टुगेदर’ हा चित्रपट २६ मे २०२३ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!