मराठीतील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची लग्नघटिका आली जवळ
लग्न पत्रिकेचा फोटो व्हायरल, बघा कोणासोबत करणार लग्न
मुंबई दि ५(प्रतिनिधी) – मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठक बाई ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. त्यामुळे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मे २०२२ मध्ये त्यांनी आपला साखरपुडा उरकला होता. त्यांच्या लग्नाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तसेच त्यांचे बँचरल पार्टी आणि केळवणाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. तसेच नुकतेच एका कार्यक्रमात गप्पा मारताना त्यांनी “आम्ही पुण्यामध्ये लग्न करणार आहोत”, असे सांगितले होते. पण त्यावेळी त्याने लग्नाच्या तारखेसंबंधित बोलणे टाळले होते. पण आता एक नवीन माहिती समोर आली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील आणखी एक कलाकार ऋचा आपटेने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हार्दिक आणि अक्षय्या यांची लग्नाची पत्रिका स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने ‘रांझना’ या चित्रपटातील गाणं जोडलं आहे. ऋचाने शेअर केलेल्या या पोस्टवरुन त्यांचा विवाहसोहळा लवकरच संपन्न होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठी मालिका विश्वातील ही जोडी नेमकी कधी लग्न करणार हा प्रश्न मात्र कायम आहे.

दोघांच्या करिअर बद्दल बोलायचे असल्यास मागच्या महिन्यामध्ये हार्दिकचा ‘हर हर महादेव’ हा पहिला ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याच्या कामाचे कौतुक होत असताना ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. तर अक्षया चतुर चोर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चतुर चोर’ हा हॉरर कॉमेडी असलेला सिनेमा आहे.