Just another WordPress site

एकनाथ शिंदेची आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीची वारी

राज्याच्या राजकारणात भूकंप?, भाजपाच्या गोटात खळबळ?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील सत्तातंराचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा भेट देणार आहेत. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते पुढील आठवड्यात गुवाहाटीला जाणार आहेत. पण यामुळे राजकीय वातावरण मात्र ढवळून निघणार आहे.

लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटातल्या मंत्र्यांना काम करताना येत असलेल्या अडचणी, मंत्र्यांना न मिळणारी मोकळीक आणि त्यातच ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेने झालेली बदनामी. अशा एक ना अनेक गोष्टी असतानाच शिंदेंचे १५ आमदार ठाकरेंकडे परतणार अशा चर्चा सुरु आहेत. त्याचबरोबर शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मोठे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे जनतेत संतापाची लाट आहे. शिवाय या सरकारकडून शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार पराभूत होण्याच्या भितीने पुन्हा मातोश्रीकडे येण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीकडुन शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात असल्यामुळे आपले आमदार सेफ ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार आहेत. पण शिंदे गटाकडून मात्र राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते.त्यामुळे एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याचा दावा केला आहे. पण या दाै-यावर राजकीय टिकाटिपण्णी केली जात आहे.

GIF Advt

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. अयोध्या दौरा आधी, की गुवाहाटी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, या दोन्ही धार्मिकस्थळी जाऊन ते सहकाऱ्यांसोबत दर्शन घेतील, असे सांगण्यात आले.पण सध्या गुवाहाटीत शिंदेच्या शेवगयाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!