Just another WordPress site

विवाहित प्रेमी युगुलाची लाॅजमध्ये गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येपूर्वी युवकाचा भावाला व्हिडीओ कॉल, कारण अद्याप गुलदस्त्यात

बुलढाणा दि १७(प्रतिनिधी)- विवाहित असूनही प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रेमी युगुलाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात समोर आली आहे. युवकाने व्हिडीओ कॉल करुन भावाला आत्महत्या करत असल्याची माहिती देत आत्महत्या केली आहे. खामगाव येथील आदर्श लॉजमध्ये दोघांनी आत्महत्या केली आहे.

GIF Advt

विकास पंजाबराव सावळे आणि शितल सुनिल नितोने असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विकासने शितल ही आपली पत्नी असल्याचं सांगून लॉजवर खोली घेतली होती. रुमवर आल्यानंतर विकासने भावाला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत फोन बंद केला. त्यानंतर विकास सावळे आणि शितल नितोने या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. विकासचा भाऊ लॉजवर आल्यानंतर लॉजच्या खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून दोघांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शितल हिला २ मुलं व १ मुलगी असून पती सुनिल हे अपंग आहेत. शितल ही मुंबई येथे पेशंट सांभाळण्याचे काम करायची तर तिचे माहेर खामगाव तालुक्यातील कंझारा आहे. तर विकासला देखील दोन मुलं आहेत.तो इंदौर येथे मशीन ऑपरेटरचे काम करीत होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!