अशा मुलींनी विचित्र हावभाव अंगप्रदर्शन करत लावणी मातीमोल केली
या प्रसिद्ध अभिनेत्रीचा इन्स्टाग्राम स्टार लावणी स्टारवर हल्लाबोल
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. तिचे बिभत्स हावभाव करून नाचतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगेने संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा मेघा घाडगेने पुन्हा गौतमी पाटीलवर टीका केली आहे. यावेळी तिने गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
मेघा घाडगेने नुकतंच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत गौतमी पाटीलचे नाव न घेता तिच्या लावणीबद्दल संताप व्यक्त केला ती म्हणाली की, आताचे जे लावणी कलाकार किंवा लावणी कलावंत आहेत. पण ते फिल्मी लावण्या, पारंपारिक लावण्या हे सादर करतात. आताच्या पिढीला लावणी इतकी सोपी वाटू लागली आहे की वाटेल तसे घाणेरड्या पद्धतीचे हावभाव, अंगविक्षेप, विकृतीचा कळस… पाहायला मिळतो. मला हे बोलतानाही त्रास होतो.आपल्या महाराष्ट्रातील लोक या कलेला इतकं प्रोत्साहन देतात की गणपती, दहीहंडी आणखी कोणत्याही जयंती असू दे या कार्यक्रमांना अशा मुलींना नाचवलं जातं. घागरा चोली घालून अंगप्रदर्शन करणे, लावणीत तर आता पदर घेणंच बंद झालं आहे. गळा इतका खाली असतो, केस मोकळे सोडून बिनधास्त नाचतात, कमरेखाली साडी इतकी गेलेली असते की आम्हालाच लाज वाटते. यामुळे शरमेने डोकं फोडून घ्यावं अशी परिस्थिती या क्षेत्रात झाली आहे. असे म्हणत मेघाने गाैतमीच्या लावणीवर आक्षेप घेतला आहे.सुरेखा पुणेकर, मी काम करत होते तेवढाच काळ लोकांनी लावणी आणि लोककला पाहिली असं मला वाटतं. आताच्या मुलींनी जो व्यवसाय करुन ठेवला आहे.अशी खंतही मेघाने व्यक्त केली आहे.

मला असं वाटत नाही की मी महाराष्ट्रात राहत नाही. कारण इतक्या दिग्गज लोकांना त्यांना दाद देताना, त्यांना मोठं-मोठे पुरस्कार घेताना बघितलं आहे, त्यांचा मान सन्मान मी बघितला आहे. आता तो सर्व मानसन्मान, इतक्या वर्षांची त्यांनी जी काही लोककलेची कमाई केली आहे सगळी मातीमोल झाली आहे.असे म्हणत तिने महाराष्ट्रातील लावलीचा वारसा लोप पावल्याची खंत व्यक्त केली आहे.