प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या
पतीने ताकीद दिल्यानंतरही प्रियकराकडून त्रास, सोलापूरात धक्कादायक घटना
सोलापूर दि १५(प्रतिनिधी)- सोलापूरच्या जुना विडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.प्रियकराच्या त्रासाला वैगातून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता कल्याणम असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर कविताचा पती रोजगार शोधण्यासाठी तामिळनाडू येथे गेला होता. त्यावेळी कविता आणि शेजारी राहणारा आरोपी संदीप राठोड यांच्यात प्रेमसंबंध जुळले. याबाबत कविताच्या पतीला कुणकुण लागल्यानंतर त्याने तिची समज दिली. तसेच कविताला असे पुन्हा होऊ नये, अशी ताकीद दिली. यानंतर या दोघांचे प्रेमप्रकरण तुटले. मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कविता कल्याणम हिची पाठ सोडत नव्हता. संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरातमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि आरोपी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, काही दिवसानंतर दोघांमधील प्रेमसंबंध तुटले. दरम्यान, रविवारी मध्यरात्री आरोपी मृत महिलेच्या घरी येऊन दरवाजा ठोठवत होता. तो बराच वेळ दरवाजा ठोठवत राहिला. वैतागून महिलेने दरवाजा उघडताच आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच माझ्याशी प्रेमसंबंध तोडू नको, अशीही धमकी दिली. या आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे.
आरोपी वारंवार या महिलेला त्रास देत होता अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील केली आहे.मृत कविताला ११ वर्षांचा मुलगादेखील आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.