Just another WordPress site

पुण्यातील वानवडीत मध्यरात्री अग्नितांडव

पुण्यात आगीच्या घटना सुरूच, परिसरात खळबळ

पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुणे शहरात अलिकडे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही शहरातील वानवडीतील महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत घरांचे नुकसान झाले मात्र या घटनेत जीवीतहानी टळली आहे. मात्र या आगीमुळे घबराटीचे वातावरण तयार झाले होते.

वानवडी गावातील शिवरकर वस्ती येथील एका खोलीत मंडपाचे सामान ठेवले होते. त्या सामानाला अचानक आग लागली. नागरिक झोपेत असतानाच आग वाढत गेली. पण आग लागल्याचे कळताच वस्तीतील नागरिक भयभयीत होऊन घराबाहेर आले. तर काही नागरिकांनी भीषण आग लागल्याचे पाहून घरातील सिलेंडर बाहेर काढले. आगीची माहिती मिळाल्यानंतर कोंढव्यातील अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.सहा गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या आगीत नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे.

GIF Advt

पुणे शहरात एैन हिवाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लुल्लानगरमध्ये एका हाॅटेलला आग लागली होती तर तर एकदा वडगाव शेरीतील भंगाराच्या गोडावूनला आग लागल्याची घटना घडली होती. तर एकदा धावत्या शिवशाही बसला आग लागण्याची घटना घडली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!