Just another WordPress site

पुण्यातील भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करणारा नराधम अटकेत

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा फॉर्महाऊस भाजपा नेते गणेश बिडकर यांचा आहे. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

GIF Advt

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गायकवाडने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. आरोपीला शिक्रापुर पोलिसांनी अटक केली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आईवडील कामाला आहेत. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने ओळखीचे आहेत. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्यामुळे मुलगी एकटी होती ही संधी साधून विशालने तिला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. आई वडील बाहेर गावाहून आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला.

अत्याचार झालेले फार्म हाऊस पुण्यातील भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीचे आहे. पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बिडकर यांच्या अटकेची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!