Latest Marathi News
Ganesh J GIF

मिस युनिव्हर्स माॅडलचे २३ व्या वर्षी अपघाती निधन

घोडेस्वारी करताना पडून झाला होता अपघात, चाहत्यांकडून श्रद्धांजली, डाॅक्टरांचे प्रयत्न पण..

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मिस युनिव्हर्स सीएना वीरचं निधन झालं आहे. वयाच्या २३ व्या वर्षी या मॉडेलनने अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना तिचा अपघात झाला. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २ एप्रिलला सिडनीच्या विंडसर पोलो ग्राऊंडमध्ये घोडेस्वारी करत होती. त्यावेळी घोड्यावरून पडून सिएनाचा अपघात झाला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागच्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. तिला डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र अखेर आज तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. सिएना एक मॉडेल आहे. मॉडेलिंग क्षेत्रात तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडली होती. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉडेल्समध्ये सिएनाची गणना केली जाते. ‘मिस युनिव्हर्स 2022’ या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. तिने सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं होते. ती सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असायची. तिने जगभरातील अनेक फॅशन शोमध्ये आपला सहभाग घेतला होता. खूप लांबचा पल्ला गाठण्याची सिएनाची इच्छा होती. या प्रवासाला तिने सुरुवातदेखील केली होती. तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर हळहळ व्यक्त होते आहे. सिएनाच्या मृत्यूनंतर तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

मॉडेलच्या मृत्यूनंतर अनेक लोक तिला श्रद्धांजली वाहत आहेत. अनेकांनी शोक व्यक्त केला. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर क्रिस ड्वायरने लिहिले की, तू जगातील सर्वात गोड आत्मा होतास. तू सर्व काही जगमग केले पण आता सगळा अंधार आहे. दरम्यान ती प्रत्येक आठवड्याच्या शेवटी न्यू साउथ वेल्स किंवा व्यापक ऑस्ट्रेलियाभोवती प्रशिक्षण आणि स्पर्धा करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा ग्रामीण सिडनीला जात असे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!