Latest Marathi News
Ganesh J GIF

‘देशाचा विचार करुन ही अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार’

अभिनेत्रीचा मतदारसंघही ठरला, 'या' मतदार संघातून भाजपाकडून लढवणार निवडणूक?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे ती अनेकदा वादात देखील सापडली आहे. अलीकडच्या काळातील तिने केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. कंगना राजकारणात येणार असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. पण आता तिने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.


कंगणाने नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली, त्यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या प्रश्नाला तिने स्पष्ट उत्तर दिले आहे ती म्हणाली “मला समाजकार्याची आवड आहे. राजकारणात काम करण्यासाठी मी पात्र आहे की नाही हे जनता ठरवेल. हा निर्णय मी जनतेवर सोपवला आहे. तोपर्यं मी अभिनय क्षेत्रात काम करत राहणार. पण देशासाठी राजकारणात काम करायण्याची संधी मला मिळाली तर मी नक्कीच देशाचा विचार करुन, राजकारणात प्रवेश करेल. जर मला कोणी राजकारणात येण्याची ऑफर दिली तर मी नक्कीच या गोष्टीचा विचार करेल,” त्याचबरोबर “माझं मत अनेकांना खटकतं. माझी लढाई एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांसोबत आहे. गेल्या काही दिवसांत नवोदित कलाकारांना संधी मिळत आहे, महिलाप्रधान सिनेमांची निर्मिती होत आहे ही आनंदाची बाब आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे”. असे म्हणत तिने आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तिच्या घराचा काही भाग पाडला होता. यावर देखील तिने भाष्य केले आहे. माझं घर अशाप्रकारे पाडलं जाईल असा मी कधीच विचार केला नव्हता. सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडलं”.असा आरोप तिने केला आहे. कंगणाने बॉयकॉट ट्रेंडवरही भाष्य केलं.देशाची लोकसंख्येपैकी अगदी एक टक्के लोक सोशल मिडीयावर असतात. त्यातही खुप कमी लोक बॉयकॉट ट्रेंड सुरू करतात. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर परिणाम होतो, असं मला वाटत नाही. असे मत मांडले आहे.


काही महिन्यापूर्वी कंगना रणौत भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर कंगना रनौतने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा असेल आणि भाजपने आपल्याला तिकीट दिल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे तिने म्हटले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!