Latest Marathi News
Ganesh J GIF

रस्त्याच्या खराब कामाची आमदाराचे केली पोलखोल

व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल,पाय घासताच डांबरी रस्ता उखडला

लखनऊ दि १(प्रतिनिधी)- खराब रस्ते ही भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. अनेक ठेकेदार खराब माल वापरून रोड बनवत भ्रष्टाचार करताना आढळून आले आहेत. युपीमधील एका आमदाराने कंत्राटदारांची ही चोरी पकडली आहे.. त्याने इतका खराब रस्ता तयार केला होता की आमदाराचे बुटांसोबत डांबरही उडू लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उत्तरप्रदेशमधील गाजीपूर येथील जखनिया विधानसभेच्या जंगीपूर-बहारीयाबादचे आमदार बेदी राम गाजीपुरमधील जंगीपुरवरुन युसुफपुरला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी आले होते. रस्ता तयार करताना निकृष्ट काम होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे तिथे जात त्यांनी निकृष्ट कामाची पोलखोल केली असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बेदी राम या डांबरीकरण सुरु असलेल्या रस्त्यावर पोहोचले आणि त्यांनी नव्याने भर टाकलेल्या रस्त्यावर एक लाथ मारली तर टाकलेली सर्व खडी आणि डांबर उडाले. सुमारे साडेचार किलोमीटरचा हा रस्ता पीडब्ल्यूडी करत असून त्यापैकी एक किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला आहे. “रस्ता चांगल्या पद्धतीने बांधला जात नव्हता शिवाय हा रस्ता वर्षभर किंवा सहा महिनेही टीकला नसता अशा अशा पद्धतीने त्याचं बांधकाम केले जात होतं. त्यामुळे सरकार आणि माझी दोघांचीही बदनामी झाली असती, पण आता ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल असे आमदार म्हणाले आहेत.

व्हिडिओ समोर आल्यानंतर गाझीपूरचे जिल्हाधिकारी आर्यका अखोरी यांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. डीएमने हेमा कन्स्ट्रक्शनविरोधातही गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ @BediRam5 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ व्हायरल होत असून सर्व आमदारांचे कौतुक होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!