Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा

'या' प्रकरणामुळे झाली शिक्षा, मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करताच सुनावली शिक्षा

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटासोबत असलेले प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

बच्चू कडू यांनी २०१७ साली अपंगाच्या मागण्यांसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी नाशिक महापालिकाआयुक्तांवर हात उगारला होता. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. यानंतर आता बच्चू कडू याना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल होता.

प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली,आम्ही काही गद्दारी केली नाही आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यानंतर कडू यांना ही शिक्षा सुनावल्याने जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!