Just another WordPress site

मुलाला धमकी देत करायला सांगितला मुलीला किस

उडीसातील काॅलेजमधील रॅगिंगचा प्रकार उघडकीस, पोलीसांची कारवाई

ओडीसा दि २०(प्रतिनिधी)- ओडिशातील एका महाविद्यालयात रॅगिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने किस घेण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. यात सहभागी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन विद्यार्थी अल्पवयीन आहेत. कॉलेज प्रशासनाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

हे प्रकरण गंजम जिल्ह्यातील ओडिशा स्कूल ऑफ मायनिंग इंजिनीअरिंग इथे घडला आहे. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका मुलीला खाली बसविण्यात आले. तर एक विद्यार्थी खुर्चीवर बसला आहे, त्याचा हातात काठी होती. तो मुलाला कानाखाली मारतो आणि मुलीला किस करायला सांगतो. तो मुलगा घाबरुन मुलीच्या गालावर किस करतो. त्यानंतर मुलगी उठून निघायला लागते. पण वरिष्ठ विद्यार्थी तिचा हात पकडत तिला खाली बसवतो.पीडितेने बडा बाजार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी या घटनेत सहभागी
पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

GIF Advt

रॅगिंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अभिषेक नाहक हा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.तर यातील दोघे अल्पवयीन आहेत.तर काॅलेजनेही या सर्वांना सक्तीचे ट्रान्सफर सर्टिफिकेट देऊन कॉलेजमधून काढून टाकले आहे.पण या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!