Latest Marathi News
Ganesh J GIF

पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्यामुळे या आमदाराला तब्बल इतका दंड

दंड न भरल्यास इतक्या दिवसाचा तुरुंगवास, बघा काय आहे संपूर्ण प्रकरण

अहमदाबाद दि २९(प्रतिनिधी)- पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याप्रकरणी नवसारी येथील न्यायालयाने वांसदा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना तब्बल ९९ रुपयांचा दंड ठोठावला आहे. पटेल यांनी ९९ रुपये न भरल्यास त्यांना ७ दिवस तुरुंगात जावे लागू शकते.

गुजरातमधील नवसारी येथील न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना शिक्षा सुनावली आहे. अनंत पटेल आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २०१७ मध्ये केलेल्या आंदोलन प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. ए. धदल यांच्या न्यायालयानं वंसदा मतदारसंघाचे आमदार अनंत पटेल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४४७ अंतर्गत दोषी ठरवले आहे. दरम्यान फिर्यादी पक्षानं अनंत पटेल यांना आयपीसी कलम ४४७ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केलीये. यामध्ये तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि ५०० रुपये दंडाची तरतूद आहे.


विद्यार्थ्यांनी १२ मे २०१७ रोजी वनविभागाच्या भरतीसाठी गैर-वनशास्त्र विषयाच्या भरतीला विरोध केला होता आणि रक्षकांना मारहाण केली होती. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१९ रोजी या सर्वांवर आरोप निश्चित करण्यात आले. पण त्याचा निर्णय आता देण्यात आला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!