Latest Marathi News
Ganesh J GIF

आयपीएलची ‘ऑरेंज कॅप’ जिंकण्यासाठी फलंदाजांमध्ये ‘टशन’

१५ वर्षात हे खेळाडू ठरले ऑरेंज कॅपचे मानकरी, बघा संपूर्ण यादी

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- आयपीएलचा सोळावा हंगाम ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत जसे विजेता कोण होणार याची उत्सुकता असते तशीच उत्सुकता अँरेंज कॅप व पर्पल कॅप कोण जिंकणार याची उत्सुकता असते.आयपीएलच्या सीजनमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देऊन सन्मानित केलं जात असते.

आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या १५ वर्षांच्या सीजनमध्ये वेगवेगळ्या फलंदाजांनी ऑरेंज कॅप जिंकली आहे. त्यातील काही भारतीय आहेत, तर काही विदेशी आहेत. २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. तेव्हा ही ऑरेंज कॅप ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज शॉन मार्शने पंजाब किंग्जकडून खेळताना जिंकली होती. तर २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या १५ व्या सीजनमध्ये जोस बटलरने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती.

ऑरेंज कॅप जिंकणारे फलंदाज

२००८- शॉन मार्श (पंजाब किंग्ज), ६१६ धावा
२००९- मॅथ्यू हेडन (चेन्नई सुपर किंग्ज), ५७२ धावा
२०१०- सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स), ६१८ धावा
२०११- ख्रिस गेल (आरसीबी), ६०८ धावा
२०१२- ख्रिस गेल(आरसीबी)- ७३३ धावा
२०१३ – मायकल हसी, (सीएसके), ७३३ धावा
२०१४- रॉबिन उथप्पा, (कोलकाता नाईट रायडर्स), ६६० धावा
२०१५- डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ५६२ धावा
२०१६- विराट कोहली, (आरसीबी), ९७३ धावा
२०१७- डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६४१ धावा
२०१८- केन विलियमसन, (सनरायजर्स हैद्राबाद), ७३५ धावा
२०१९- डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६९२ धावा
२०२०- के एल राहुल, (पंजाब किंग्ज), ६७० धावा
२०२१- ऋतुराज गायकवाड, (सीएसके), ६३५ धावा
२०२२- जॉस बटलर, (राजस्थान रॉयल्स), ८६३ धावा

संघनिहाय विचार करायचा झाल्यास हैद्राबादच्या चार फलंदाजांनी ऑरेंज कॅप जिंकली आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबीच्या फलंदाजांनी ३-३ वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. तसंच पंजाब किंग्जने २ आणि राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी १-१ वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!