मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे नाराज?
मोरेंच्या पक्षातील या नेत्यांवर निशाना, पक्ष नेतृत्वाला दिला इशारा
पुणे दि २७(प्रतिनिधी)- एकीकडे राज ठाकरे पक्षाची बांधनी करत असताना पुण्यात मात्र मनसेतील नाराजी नाट्य सुरूच आहे पुण्यातील मनसेचे नेते संजय मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यात मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या नाराजीवर बोलताना मला या कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया एका वृत वाहिनीला दिली आहे. त्यामुळे पुणे मनसेत अस्वस्थता आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटतट आणि वाद विसरून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दापासून चर्चेत असेलेले वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज आहेत. मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. मात्र त्यांना भाषणच करू देण्यात आले नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेमुळे मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.मोरे यांनी यावेळी पक्षातील विरोधकांवर टिका केली आहे.
“मी नाराज नाही. माझे कार्कर्ते नाराज आहेत. पुणे शहरात मनसेच्या शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कोअर कमिटीचे सदस्य होते. या मेळाव्यादरम्यान मंचावर असल्यामुळे मला बोलू द्यायला हवं होतं, अशी भावना माझ्या कार्यकर्त्यांची आहे. असे म्हणत मोरे यांना पक्ष नेतृत्वाला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.