मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भाजप नेत्या चित्रा वाघ विरुद्ध मॉडेल उर्फी जावेद यांच्यामध्ये सुरू असणारा वाद आता महिला आयोग आणि पोलीसांपर्यंत पोहोचला आहे. पण वाघ यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या उर्फीच्या अडचणी वाढल्या आहेत.कारण वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात आणि महिला आयोगामध्येही तक्रार केली होती. आता पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस धाडली आहे. त्यामुळे तिला अटकही होऊ शकते.
उर्फीने महिला आयोगाची भेट घेतल्यानंतर पोलीसांनी देखील अभिनेत्री उर्फीला मुंबईच्या अंबोली पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली असून तिला चाैकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशीसाठी बोलावल्यानंतर उर्फीला मुंबई पोलीस अटक करणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे. पण उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सुरू झालेला वाद राजकीय मुद्दा बनला. आता उर्फीला बजावण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतर या प्रकरणात काय वळण येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उर्फीच्या कपड्यांवरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असणारा वाद आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इतक्या दिवस सोशल मिडीयावर वाघ यांना आव्हान देणाऱ्या उर्फीवर अटकेची टांगती लवकर लटकत आहे. त्यामुळे उर्फी कायदेशीर उत्तर देणार की चाैकशीला दांडी मारणार यावर देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत