Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेना भेटणार?

ठाकरे गटाकडून प्लॅन 'बी'ची तयारी, सादिक अली प्रकरण ठाकरेंच्या अडचणीचे

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाचे नाव आण पक्षचिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोग येत्या १७ जानेवारीला करणार आहे. पण जर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाले तर काय करायचे याची तयारी ठाकरे गटाने सुरु केली आहे. ठाकरे गटाने प्लॅन बी तयार केला असून त्यामुळं ठाकरे गटाने निकाला आधीच पराभव मान्य केल्याची चर्चा आहे. ठाकरेंचा प्लॅन बी कसा असेल याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर दोन प्रकारे तयारी सुरु करण्यात आली आहे. एक म्हणजे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. तसेच पक्षासाठी निवडणूक चिन्ह आणि नाव ठरवण्याचा फैसला ठाकरे गट जनतेवर सोपवेल. आमदार आणि खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने सादिक अली केसचा आधार घेतला तर एकनाथ शिंदे गटाकडून निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निकालानंतर काय करायचे, याचे नियोजन सुरु केले आहे. दुसरीकडे शिवसेनेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार यासंबंधीच्या महत्त्वाच्या याचिकांवर ही सुनावणी सुरु आहे. त्याची सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे त्या निकालानंतर पक्ष आणि चुन्याचा निकाल देण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जाणार आहे. पण सध्याच्या परिस्थितीतनुसार १७ जानेवारीला पक्ष कोणाचा याचा निर्णय होणार आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. निकालानंतर अनेकजण ठाकरेंची साथ सोडू शकतात. त्यामुळे ठाकरे गट पक्ष सुनावणी अपात्रतेच्या निकालानंतर घेण्यासाठी आग्रही आहे. पण निकालाआधीच ठाकरे गटाकडून प्लान बी ची तयारी सुरु झाल्याने ठाकरेंनी पराभव मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!