दिल्ली दि १५ (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांसाठी पाच संकल्पांची घोषणा केली आहे. जेव्हा आपण आपलीच पाठ थोपटून घेतो तेव्हा आपल्या स्वप्नांपासून थोडे दूर राहतो.असे मोदी यावेळी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलेले 5 संकल्प
पहिला संकल्प
आता देश मोठा संकल्प घेऊन जाणार आहे. खूप जिद्द घेऊन चालायचे आहे. यातीव मोठा संकल्प म्हणजे विकसित भारत.
दुसरा संकल्प
आजही आपल्या मनात गुलामगिरीचा अंश कोणत्याही कोपऱ्यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत टिकू दिला जाऊ देऊ नये. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल.
तिसरा संकल्प
आपल्याला आपल्या वारस्याचा अभिमान असायला हवा. हा तो वारसा आहे ज्याने एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दिला. या वारस्याचा आपल्याला अभिमान असायला हवा.
चौथा संकल्प
एकता आणि एकता. 130 कोटी देशवासीयांमध्ये एकता हवी. ना कोणी आपला ना कोणी परका. एकतेची शक्ती हा एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपला चौथा संकल्प आहे.
पाचवा संकल्प
नागरिकांचे कर्तव्य. ज्यामधून पंतप्रधानही बाहेर नाहीत, किंवा मुख्यमंत्रीही, तेही नागरिक आहेत. येत्या २५ वर्षांची स्वप्ने पूर्ण करणे ही मोठी प्राणशक्ती आहे. जेव्हा स्वप्ने मोठी होतात, जेव्हा विचार मोठे असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात.
त्याचबरोबर लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले. राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीचे प्रतिबिंब इतर क्षेत्रातही उमटत असल्याचे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचारावर देखील टिका करताना मेड इन इंडीयाला चालना देण्याचा विश्वास व्यक्त करताना ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’हा नवा नारा देशवासियांना दिला.