Just another WordPress site

हॉलिवूडमधील या अभिनेत्रीचा सर्वात महागडा घटस्फोट

अब्जाधीश अभिनेत्रीला पतीकडून मिळणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

मुंबई दि १(प्रतिनिधी)- अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही त्यांच्या मुलांची जॉइंट कस्टडी मिळाली आहे. याबरोबरच कोर्टाने घटस्फोटात किमला कान्ये वेस्ट किती रक्कम देईल, याबद्दल आदेशही दिले आहेत.

GIF Advt

किम आणि कान्ये चार मुलं किम कार्दशियन हिच्याबरोबरच रहाणार आहेत. मुलांच्या खर्चासाठी कान्ये वेस्टला दर महिन्याला  २००,००० डॉलर म्हणजे जवळपास १.६५ कोटी रुपये किमला द्यावे लागणार आहेत. किम आणि कान्येची मोठी मुलगी नॉर्थ ही ८ वर्षांची आहे, दुसरा मुलगा सेंट ६, मुलगी शिकागो ४, मुलगा सालम ३ वर्षांचे आहेत. पण
मुलांच्या हिताचे मोठे निर्णय घेताना दोघांनाही एकमेकांशी बोलावे लागेल. तसेच मुलांची सुरक्षा, शाळा आणि कॉलेजचा खर्च किम आणि कान्ये या दोघांनाही करावा लागेल, असे न्यायालयाने सांगितले आहे. किम कार्दशियनने आपल्या नावातून वेस्ट ही काढून टाकलं होतं. सध्या कान्ये वेस्ट नवीन अडचणीत सापडला आहे. स्पोर्ट्सवेअर कंपनी आदिदासने रॅपरविरोधात चौकशी सुरू केली आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने किम कार्दशियनचा इंटिमेट फोटो लोकांना दाखवला होता असा त्याच्यावर आहे.


हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून अभिनेत्री किम कार्दशियनकडे पाहिलं जातं. इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींपैकी ती एक आहे. किम एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल ६.४ कोटी रुपये घेते. तिने अमेरिकेची फस्ट लेडी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!